Dighi News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिची छेड काढत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना सन 2019 ते 26 जून 2021 या कालावधीत दिघी गावठाण येथे घडली.

पवन उर्फ प्रवीण कदम (वय 35 रा. मोरया अंगणच्या समोर, दिघी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. 26) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कदम हा फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करीत असे. तिच्या नावाने रोडवर ‘आय लव्ह यु’ असे खडूने लिहीत असे. येता-जाताना मुलीकडे पाहून तिच्या टोपण नावाने आवाज देत असे. शनिवारी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.