Bavdhan Murder Case : बांधकाम कामगार खून प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बावधान येथे एका बांधकाम कामगाराचा 25 जून रोजी खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत याप्रकरणी एकाला अटक केली आहे. आणखी तीन जणांची नावे सुद्धा याप्रकरणी पुढे आली आहेत. 

सोहेल शेख (वय 22 वर्षे, वारजे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रदीप राजोळे, प्रकाश कांबळे उर्फ कळवा, आकाश पवार उर्फ चल्या ह्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पितबसा जानी (वय 57 वर्षे, रा. गंगा लिजंड सोसायटी लेबर कॅम्प, बावधन, मूळ गाव नर्सिगुडा, पोस्ट धांद्रा, जिल्हा नबरंगपुर, ओडिसा राज्य) या बांधकाम कामगाराचा 25 जून रोजी दुपारी 4.27 च्या दरम्यान खून करण्यात आला होता.

PMPML News : “मी पीएमपीएमएलचा प्रवासी” स्पर्धा; लेख, उत्कृष्ठ कविता, उत्कृष्ठ फोटो, उत्कृष्ठ व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

याबाबत त्यांच्या मुलाने – उपेंद्र जानी, वय 17 वर्षे याने फिर्याद दिली आहे. 25 जून रोजी लेबर कॅम्पच्या परिसरात काही जण बर्थडे साजरा करण्यासाठी आले होते व कोणाचीतरी वाट पाहत होते व तेथेच मस्ती करत होते. त्यांना शांत राहण्यास फिर्यादीचे वडिलांनी व इतर 3-4 जणांनी सांगितले असता त्यांनी तेथून जाण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी नितेश शेलार यांनी लेबर कॅम्पमधील चंदन यास मारहाण केली होती. त्यावेळी कॅम्प मधील इतर लोकांनी चंदन यास मारले या करणावरून मारहाण केली व जखमी केले.

त्यानंतर नितेश शेलार्व त्याचे मित्र आरोपी यांनी लेबर कॅम्प मधील लोकांना धमकी दिली की आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला उद्या संपवून टाकतो, असे बोलून तिथून निघून गेले. या करणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी यांनी संगनमताने फिर्यादीच्या वडिलास कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यात व हातावर वार करून त्यांना जखमी करून जीवे ठार मारले. सर्व आरोपिंविरोधात भा. द. वि. कलम 302 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.