Wakad News : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक; 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – गांजा बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून 635 ग्रॅम गांजासह 81 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) रात्री माऊली चौक, वाकड येथे करण्यात आली.

बाळू महादेव वाघमारे (वय 31, रा. वाकड रोड, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विक्रम कुदळ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू वाघमारे हा त्याच्या दुचाकीवरून गांजा घेऊन जात असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. आरोपी बाळू याला दुचाकीसह ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 635 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 81 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बाळू याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.