Hinjawadi Crime News : कामाचे पैसे मागितल्याने कामगार तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – केलेल्या कामाचे पैसे कामगाराने मागितले असता ठेकेदाराने कामगाराला आणि त्याच्या मित्राला लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेसात वाजता मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली.

ठेकेदार पोलु (रा. लेबर कॅम्प, म्हाळुंगे, ता. मुळशी) असे आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी विजेंद्र रामबहादूर यादव (वय 24, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र आरोपी ठेकेदार पोलु याच्याकडे काम करत होते. फिर्यादी यांनी केलेल्या कामाचे पैसे ठेकेदाराकडे मागितले असता त्याने लोखंडी सळईने फिर्यादी यांच्या डोक्यात, पायावर मारून दुखापत केली. तसेच फिर्यादीचा मित्र राम मोहन यालाही हातावर मारून दुखापत केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.