Ravet Crime News : भांडण सोडविणा-यावर शस्त्राने वार

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत भांडण करत असलेल्या व्यक्तीला भांडण न करण्याबाबत सांगत भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीवर भांडणा-याने शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री साडेआठ वाजता रावेत येथे घडली.

बाळू राजाराम तुपे (वय ३५, रा. भोंडवे वस्ती, रावेत) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुपे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. रावेत मधील विनायक भोंडवे यांच्या वीटभट्टीजवळ फिर्यादी यांचा मित्र सचिन कदम याच्याशी आरोपी आकाश भांडण करत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी दोघांना ‘तुम्ही भांडण करू’नका’ असे बोलून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. ‘तू मला सांगणारा कोण. तुमच्या भांडणात पडू नकोस’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्यावर शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.