Sangvi Crime News : बेकायदेशीरपणे सिलेंडरमधून गॅस चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर व धोकादायकपणे भरलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. 30) दुपारी उघडकीस आली.

दत्ता नवनाथ वागलगावे (वय 23, रा. बुद्ध विहारासमोर, पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे कर्मचारी प्रशांत नंदाराम सैद यांनी मंगळवारी (दि. 30) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिंपळे सौदागर येथे असलेल्या गणाधिश सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर शेड टाकून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस काढून तो इतर गॅसमध्ये भरत असताना दिसला तसेच गॅस एजन्सीच्या मालकानेही रिकामे सिलेंडर जमा केलेले नाहीत. भरलेले गॅस सिलेंडर वितरणासाठी नेलेले नाहीत, हे माहिती असल्याने त्यानेही सदरचा गुन्हा करण्यास सहमती दर्शविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.