Kashinath Nakhate : कर्मवीरांची कमवा व शिका योजना पथदर्शी – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज : कष्टकरी, कामगार यांची गरीब मुले शिक्षण घेऊ शकत नव्हती, त्या कालावधीमध्ये दूर दूरवर शाळा नव्हत्या अशा काळात कष्टकरी कामगार, बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजना आणली आणि त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून उच्च शिक्षण घेण्याचे पथदर्शी नियोजन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. यामुळे महाराजा सयाजीराव मोफत व निवासी रूपात 101 हायस्कूल निर्माण करून शिक्षणाचे द्वारे खुले केली कर्मवीर भाऊराव पाटील हे यांची कमवा व शिका योजना ही पथदर्शी होती आणि आहे, असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते (Kashinath Nakhate) यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांचे वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, इरफान चौधरी, आशा गव्हाणे, राधाताई मोरे, साहीद शेख, ओमप्रकाश मोरया, शंकर भंडारी, अमोल भंडारी, राजेश सिंग, राम राय, अहमद शेख आदी उपस्थित होते.

Atul Pardeshi : अतुल परदेशी यांचा ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’ पुरस्कार देऊन सन्मान

कर्मवीर भाऊराव पाटलाने अन्याय, विषमता, अत्याचार विरोधात दंड थोपटले 1919 ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून खेडोपाडी, गावोगावी प्राथमिक शाळा चे जाळे उभारले याची संख्या 538 पर्यंत पोहोचवली अशा कर्मवीरांना आम्ही शतशः प्रणाम करतो अशी भावना कामगारांनी (Kashinath Nakhate) व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.