Pimpri Corona Update : रविवारी शहरात 175 नवीन रुग्ण; 171 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 2) दिवसभरात 175 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 79 हजार 423 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 75 हजार 160 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 468 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 234 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 234 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 8 हजार 129 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजवर शहरातील 29 लाख 82 हजार 257 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.