Pimpri News: तेलंगणातील अल्पवयीन शीख मुलीवर लैंगिक अत्याचाराचा पिंपरीत निषेध

एमपीसी न्यूज – तेलंगणा राज्यात अल्पवयीन शीख मुलीवर लैंगिक आत्याचार करुन तिचा खून केला आहे. पिंपरी येथील शीख समुदायाने आज (दि.20) पायी यात्रा काढत या घटनेचा निषेध केला. यावेळी तेलंगणा सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

या निषेध यात्रेत श्री गुरुनानक दरबारचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह अडिवाल, सचिव गुरविंदर सिंह, मनान सिंह, सरबजोत सिंह क्रांतिवीर विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु सबनानी, हरमिंनदर कौर व मोठ्या प्रमाणावर शीख बांधव या निषेध यात्रेत सहभागी झाले.

निषेध मोर्चात शीख बांधवांनी तेलंगणा सरकार विरोधात घोषणा दिल्या. ‘तेलंगणा सरकार शरम करो, शीख बेटी के साथ न्याय करो’, ‘वुई वॉन्ट जस्टिस’ असे बॅनर हातात घेऊन शीख बांधवांनी घटनेचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.