Pune ACB Trap News : गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज : हाणामारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला रंगेहात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय 50) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात ते कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीचे भांडण झाले होते. नंतर हे प्रकरण पोलिसात गेले होते.  केस दाखल करताना या प्रकरणातून तक्रारदार व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी असलेल्या दादासाहेब यांनी 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार व्यक्तीने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या माहितीची खातरजमा केली आणि आज सकाळी ही लाच स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.