Pune Police : पुणे पोलीस दलातील कर्मचारी लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज : अनधिकृत बांधकाम (Pune Police) थांबविण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पुणे पोलीस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हा कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शिरीष आप्पासाहेब कामठे (वय 36) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Pimpri Crime : बांधकाम सेंन्ट्रींगच्या भाड्याने घेतलेल्या प्लेटची परस्पर विक्री करुन 9 लाखाची फसवणूक

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणीकंद पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे हे नेमणूकीस आहेत. याप्रकरणातील तक्रारदार व्यक्तीच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी पोलीसांकडे याबाबत मदत मागतिली होती.

लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Pune Police) कर्मचारी शिरीष कामठे यांनी हे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाईत 1 लाख 10 हजार रुपयांच्या लाचेमधील 10 हजार रुपयांची लाच घेताना कामठे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान, ट्रॅपमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.