RPI : आरपीआय पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी समीर जाधव

एमपीसी न्यूज : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे जिल्हा युवक आघाडी (RPI) अध्यक्षपदी समीर जाधव यांची निवड करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कान्हे फाटा येथे पार पडला. यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी साळवे हे होते, यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष, लक्ष्मण भालेराव, खंडू जाधव, रवींद्र कांबळे, विक्रम शेलार, रुपेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या आधी जाधव यांनी पुणे जिल्हा युवक संपर्क प्रमुख (RPI) म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून कामशेत खडकाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक आहेत. जाधव यांचा निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.