Pune Crime : पुणे जिल्ह्यात गोळीबार करून 3 कोटी 60 लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दरोड्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे सहा जणांनी चारचाकीवर गोळीबार करत गाडीतील साडेतीन कोटींची रोकड लुटल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून इंदापूर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भावेशकुमार अमृत पटेल (वय 40, मूळ रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डिंग, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या चारचाकी वाहनातून पुणे सोलापूर-राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याकडे जात होते. त्यावेळी वरकुटे बुद्रुक गावाच्या हद्दीत वरकुटे पाटीजवळच्या गतिरोधकाजवळ गाडीची गती कमी झाल्यानंतर पायी चालत आलेल्या चार अज्ञात इसमांनी हातातील लोखंडी टॉमी दाखवत फिर्यादीला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने गाडीचा वेग वाढवला. हे पाहून त्या चोरट्यांनी दुसऱ्या कारमधून पटेल यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावर गाठून फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्याला मारहाण केली.

Karuna Munde : करुणा मुंडे यांना एकाने 30 लाखाचा गंडा घातला, गुन्हा दाखल

त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या (Pune Crime) गाडीमधील 3 कोटी 60 लाख रुपये, फिर्यादी जवळचे 14 हजार रुपये व 12 हजार रुपये किमतीचे व्हिओ कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण 3 कोटी 60 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यानच्या काळात आणखी दोन अज्ञात चोरटे गाडीत बसले होते. दरम्यान, पटेल यांच्याकडे एवढी रक्कम कोठून आली. ते कोठे निघाले होते. याबाबत अद्यापर्यंत कोणीतीही माहिती मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.