Exam Time Table : दहावी, बारावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी होणार उपलब्ध

एमपीसी न्यूज – मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी (दि.21) मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

बारावीची परीक्षा 4 मार्चपासून, तर दहावीची परीक्षा 4 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या –  www.mahahsscboard.in

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.