Pune News : किरकोळ कारणावरून दुचाकीस्वारावर कात्रीने वार

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एका दुचाकीस्वारावर कात्रीने वार करण्यात आले. शनिवारी दुपारच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ ही घटना घडली. दुचाकीवर पाहुणे सोडविण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाया दुचाकीस्वाराने धक्का दिला. त्यामुळे संबंधिताने त्यांना गाडी सावकाश चालवा असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी दुचाकीस्वारावर कात्रीने वार करुन जखमी केले. 

याप्रकरणी ऋतिक विलास खाटपे (रा. दांडेकर पूल) आणि सूरज शिवप्पा चलवादी (रा. पानमळा, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  साहेब चॉदसाब सय्यद (वय ५१, रा. उत्तमनगर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.  सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी सय्यद दुचाकीवरुन पाहुण्यांना सोडविण्यासाठी स्वागरेटला चालले होते. त्यावेळी दांडेकर पूलाजवळ पाठीमागून आलेल्या ऋतिकने त्यांना धडक दिली. त्यामुळे सय्यद यांनी त्यांना गाडी सावकाश चालवा असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे ऋतिक अणि सूरजने सय्यदला काठीने मारहाण करुन कात्रीने वार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.