Sidhu Moose wala Murder Case : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील आरोपी सौरव महाकाल याला नारायणगाव परिसरातून अटक

एमपीसी न्यूज –  सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी गोळ्या झाडून  (Sidhu Moose wala Murder Case) हत्या करण्यात आली होती. यामध्ये एकूण 8 जण सहभागी असल्याचं सांगितलं जातं. यातील दोघे पुण्यातील असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 

 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव आणि तळेगाव दाभाडे येथील सौरव महाकाल या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी आता सौरव महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक केली आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याला मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

 

 

ऑगस्ट 2021 मध्ये मंचर परिसरात ओंकार बानखेले या तरुणाचा खून झाला होता. संतोष जाधव या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. याशिवाय संतोष जाधव याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली आहे. तेव्हापासून तो फरार आहे.

 

Suicide News : बारावीमध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याने उचलले कठोर पाऊल

 

दरम्यान सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात (Sidhu Moose wala Murder Case) संतोष जाधव आणि सौरव महाकाळ यांची नावे समोर आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला होता. त्यानंतर सौरव महाकाळ याला अटक करण्यात आली.
सौरव महाकाळ याला कोर्टात हजर केले असता 12 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे.

 

आरोपी सौरव महाकाल हा संतोष जाधव याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.