Deccan eleven : डेक्कन इलेव्हन, रेंजहिल्सचा संघर्षपूर्ण विजय

एमपीसी न्यूज : पीडीएफएच्या नव्या मोसमातील प्रथम श्रेणीच्या सामन्यात आज संघर्षपूर्ण लढती बघायला मिळाल्या. डेक्कन इलेव्हन (Deccan eleven) आणि रेंजहिल्स यंग बॉईज संघांना विजयासाठी झगडावे लागले.
मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे झालेल्यालढतीत डेक्कन ‘ब’ संघाने ‘सी’ गटातील सामन्यात टायगर कंबाईनचा 1-0 असा पराभव केला. सामन्यातील एकमात्र गोल गौरव गाबा याने 51 व्या मिनिटाला केले.
त्यानंतरच्या सामन्यात रेंजहिल्स यंग बॉईज संघाने ब्ल्यू स्टॅग संघाला 2-1 असे पराभूत केले. प्रयत्नपूर्वक खेळ करून ब्लू स्टॅगने सामन्यात बरोबरी आणली होती. मात्र, अतिरिक्त वेळेत त्यांना आपला बचाव अभेद्य ठेवता आला नाही. त्यांचा गाफिलपणा त्यांना महागात पडला आणि शंशाक यादव रेंजहिल्ससाठी हिरो ठरला.
शंशाकनेच सामन्याच्या 22व्या मिनिटाला रेंजहिल्सचे खाते उघडले होते. याच आघाडीवर त्यांनी विश्रांतीपर्यंत वर्चस्व राखले. मात्र, उत्तरार्धात तिसऱ्याच म्हणजे सामन्याच्या 43व्या मिनिटाला सचिन चंडेल याने गोल करून ब्लू स्टॅगला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ब्लू स्टॅगच्या खेळाडूंनी प्रयत्नपूर्वक ही बरोबरी सांभाळली होती. मात्र, सामन्याच्या अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या मिनिटाला शंशाकने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा विजयी गोल केला.
दिवसातील अखेरच्या (Deccan eleven) सामन्यात ‘डी’ गटात डेक्कन ‘डी’ संघाने रेंजहिल्स मिलानचे आव्हान 2-1 असे परतवून लावले.

सौरभ शिंदे याने सामन्याच्या 10व्या मिनिटाला गोल करून डेक्कनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी ही आघाडी टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सामन्याच्या संदेश सरोदे याने 66व्या मिनिटाला गोल करून रेंजहिल्स मिलानला बरोबरीवर आणले. मात्र, अखेरच्या टप्प्यात 77व्या मिनिटाला शंकर खोर्लागडे याने गोल करून डेक्कनचा विजय साकार केला.
निकाल –
सिटी स्पोर्टस अरेना, मोशी – प्रथण श्रेणी
गट सी – डेक्कन इलेव्हन ब 1 (गौरव गाबा 51वे मिनिट) वि.वि. टायगर कंबाईन 0
गट डी -रेंजहिल्स यंग बॉईज 2 (शशांक यादव 22 आणि 82वे मिनिट) वि.वि. ब्लू स्टॅग (सचिन चंडेल 43वे मिनिट)
डेक्कन इलेव्हन डी 2 (सौरभ शिंदे 10वे मिनिट, शंखर खोर्लागडे 77वे मिनिट) वि.वि. रेंजहिल्स मिलान 1 (संदेश सरोदे 66वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.