Surrogate Ads: वेलची आणि सोडाच्या नावावर गुटखा आणि दारूची प्रसिद्धी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी!

एमपीसी न्यूज : सोडा, वेलची अशा जाहिराती करून गुटखा आणि दारू विकणारी उत्पादने (Surrogate Ads) तुम्हीही पाहिल्या असतील. प्रत्यक्षात, जाहिरातींचा उद्देश प्रेक्षकांना म्हणजेच ग्राहकांना भुरळ घालणे हा असतो. सरकारने आता अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही एक, दोन प्रकरणे लोकांनी समोर आणल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. मात्र आता दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या आणि ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी मोफत दावे करणाऱ्या जाहिरातींचा समावेश आहे.

जाहिरात जारी करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ‘सरोगेट’ जाहिरातींवरही बंदी घातली आहे आणि जाहिराती दाखवताना घोषणेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तत्काळ प्रभावाने लागू झाली आहेत.

Rajya sabha Election 2022 : फडणवीसांचा मास्टर प्लॅन; राज्यसभेत भाजपचे तीनही उमेदवार विजयी!

सोडा वॉटरच्या बहाण्याने दारूची भर पडली

‘सरोगेट’ जाहिराती (Surrogate Ads) प्रत्यक्षात छद्म-जाहिराती असतात. ज्या दुसऱ्या उत्पादनाचा प्रचार करतात. जसे सोडा वॉटरच्या बहाण्याने दारूचा प्रचार करणे किंवा वेलचीच्या बहाण्याने गुटख्याची. या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा करताना, ग्राहक व्यवहार सचिव, रोहित कुमार सिंग म्हणाले, की “ग्राहक जाहिरातींमध्ये खूप रस घेतात. CCPA कायद्यांतर्गत, ग्राहकांच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याच्या तरतुदी आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे प्रिंट, टेलिव्हिजन आणि ऑनलाइन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींना लागू होतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास केंद्रीय ग्राहक संरक्षण कायद्यातील (CCPA) तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.