Tata News : टाटा मोटर्सकडून पदक चुकलेल्या 240 ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान ; अल्‍ट्रोज कार भेट

एमपीसी न्यूज – टोकियो ऑलिम्पिक्‍समध्‍ये थोडक्‍यात कांस्‍य पदक चुकलेल्‍या भारतीय ॲथलीट्सचा टाटा मोटर्सकडून नुकताच सन्मान करण्यात आला. खेळाडूंच्या सन्मानार्थ टाटा मोटर्सने हॅचबॅक्‍सची सुवर्ण  मानक असलेली टाटा अल्‍ट्रोज कार त्यांना भेट दिली. तब्बल 240 खेळाडूंचा टाटाने सन्मान केला. 

टोकियो ऑलिम्पिक्‍समध्‍ये भारताला सात पदकं मिळाली, काही खेळाडूंची कांस्य पदके थोडक्यात चुकली. पण, या स्‍फूर्तीदायक कामगिरीच्‍या माध्‍यमातून लाखो लोकांची मने जिंकली आहेत आणि अब्‍जो लोकांना प्रेरित केले आहे. या खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन करण्‍यासाठी टाटा मोटर्सने हॉकी, रेसलिंग (कुस्‍ती), गोल्‍फ, बॉक्सिंग आणि डिस्‍कस थ्रो अशा विभागांमधील 240 ऑलिम्पियन्‍सना सन्‍मानित केले.

टाटा मोटर्सच्‍या पॅसेंजर वेईकल बिझनेसचे अध्‍यक्ष शैलेश चंद्रा म्‍हणाले, ‘टोकियो ऑलिम्पिक्‍समध्‍ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या ॲथलीट्सचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्‍यांच्‍यासोबत मंचावर उपस्थित राहणं हे माझं भाग्‍य‌ समजतो. या खेळाडू व त्यांच्या अथक मेहनतीला सलाम करत त्‍यांना, प्रीमियम हॅचबॅक्‍समधील सुवर्ण मानक असलेली टाटा अल्‍ट्रोज भेट म्‍हणून देत आहोत.’

‘आमच्‍याकडून त्‍यांना भावी आयुष्‍यासाठी मन:पूर्वक शुभेच्‍छा! आम्‍हाला विश्‍वास आहे की, आगामी वर्षांमध्‍ये ते आपल्‍या देशाला अभिमान वाटावा अशी का‍मगिरी करतील.’ असं चंद्रा यांनी नमूद केले.

अल्‍ट्रोज कार ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही कार यशाच्‍या नव्‍या उंचीवर पोहोचत आहे. अल्‍ट्रोजमध्ये चांगले डिझाइन, फाईव्ह स्‍टार ग्‍लोबल एनसीएपी सुरक्षितता, तसेच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट, लेदरच्या सीट्स, आयआरए कनेक्‍टेड कार तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक हेडलॅम्‍प्‍स, रिअर एसी वेण्‍ट्स अशी अनेक प्रि‍मिअम वैशिष्‍ट्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.