India Corona Update : संसर्ग मंदावतोय ! देशभरात 57,118 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्ग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून नव्यान वाढ होणा-या रूग्णांची संख्या कमी झाली असून, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रूग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 54 हजार 118 अॅक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या चोवीस तासांत देशभरात 5 हजार 324 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. देशात आजवर 4 कोटी 29 लाख 67 हजार 315 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापौकी 4 कोटी 23 लाख 98 हजार 095 जण बरे झाले आहेत. चोवीस तासांत 9 हजार 620 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.68 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत 66 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 15 हजार 102 रूग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.20 टक्के एवढा आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 178 कोटी 90 लाख 61 हजार 887 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत 4 लाख 80 हजार 144 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.