Akurdi News : विठ्ठलवाडी येथे पतीने केला पत्नीचा खून 

एमपीसी न्यूज – विठ्ठलवाडी येथे एका महिलेचा खून  केल्याची घटना रविवारी (दि. 6) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रितू श्याम ढेरे (वय 20) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश दीपक दरेकर (वय 25) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  श्याम राजू ढेरे (रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी. मूळ रा. जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम आणि  त्याची पत्नी रितू विठ्ठलवाडी येथे राहत होते. श्याम याने पत्नी रितू यांचा अज्ञात कारणासाठी खून केला आणि रितू यांचे प्रेत घरातील शौचालयात टाकले. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.