Chinchwad News : शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी फोन करून बाहेर बोलावून घेत शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना रविवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

अर्जुन रावत मुल्लीमनी (वय 36, रा. प्राधिकरण निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रोहिणी गोकुळ गायकवाड (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मामा ज्ञानदेव श्रीरंग साठे (वय 45) यांचा खून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामा ज्ञानदेव यांना शनिवारी (दि. 5) रात्री साडेदहा वाजता एका व्यक्तीने फोन करून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर ते घरी आले नाहीत. रविवारी सकाळी नऊ वाजता ज्ञानदेव यांचा मृतदेह कृष्णा हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेत आढळला.

फोन करून बाहेर बोलावून ज्ञानदेव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना रक्तबंबाळ करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.