Maval News : …तर त्या नागरिकांना क्वारंटाईन करणार – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेली पण लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर त्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने आमदार सुनील शेळके यांनी मावळ वासीयांना लस घेण्याचे आवाहन करत क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला आहे.

 मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असुन नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे गरजेचे असुन येत्या 15 जानेवारी पुर्वी कोरोना लसीचे दोन डोस मुदतीत घेणे अनिवार्य असुन ज्यांची दुसर्‍या डोसची  मुदत होऊनही डोस न घेतल्यास 15 जानेवारी नतंर ती व्यती बाहेर आढळ्यास त्याला क्वारंटाईन  करण्यात येईल असा इशारा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिला.

मावळ तालुक्यात येत्या दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत असुन त्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध पाळण्यासाठी आज मावळ तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी यांची बैठक येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली त्या वेळी आमदार सुनिल शेळके बोलत होते

यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका समन्वयक गुणेश बागडे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी , सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.