Khadki Crime News :गल्लीत भाईगिरी करतोस काय, म्हणत तरुणासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बावीस वर्षीय तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली. गल्लीत भाईगिरी करतो आणि नेहमी चार-पाच मित्र सोबत घेऊन गल्लीमध्ये फिरत असतो या कारणावरून ही भांडण झाली. शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये हा प्रकार घडला.

इरफान दस्तगीर शेख (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आजर जावेद शेख (वय 22) याने फिर्याद दिली असून खडकी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी आणि आरोपी दोघेही शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट परिसरात राहतात. शनिवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले आणि इरफान शेख याने लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांना मारहाण केली. ‘तुमचे खानदानात संपवून टाकतो यापुढे तुम्ही वस्ती मध्ये कसे राहतात तेच बघतो’ असे म्हणत लोखंडी रॉड हवेत फिरवून दहशत पसरवली.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेल्या इरफान शेख यांनी देखील तक्रार दिली असून आज आदर जावेद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीत पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.