Pimpri News : चोरीच्या बातम्या पोलिसांना का दिल्या म्हणत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – चोरी केल्याच्या बातम्या पोलिसांना का दिल्या असे म्हणत 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन इसमाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ धाम हौसिंग सोसायटी जवळ, मिलिंद नगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि.18) रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

सागर ज्ञानदेव ढावरे (वय 19, रा. मिलिंद नगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अजय जालिंदर सिंह टाक आणि नितीन राजेंद्र पारचा (दोघेही रा. मिलिंद नगर, पिंपरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही केलेल्या चोरीच्या बातम्या पोलिसांना का दिल्या, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी मुलावर कोयत्याने गंभीर वार केले. शिवीगाळ करून तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.