Sangavde News : सांगावडे येथे शिवजयंती उत्सव कमिटी व ग्रामपंचायत मार्फत आरोग्य तपासणी शिबीर

एमपीसी न्यूज – सांगावडे येथे अखिल शिवजयंती उत्सव कमिटी व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्त 19 मार्च रोजी गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते.

आरोग्य शिबीर तपासणी मध्ये नेत्र तपासणी,शुगर, बीपी, ईसीजी,एक्सरे इत्यादीसोयी सुविधा देण्यात आल्या होत्या यावेळी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे देण्यात आले व गावातील ज्येष्ठ नागरिकांनावॉकर स्टिक वाटप करण्यात आल्या.

आरोग्य शिबिरासाठी गावातील सर्व नागरिक आवर्जून उपस्थित झाले होते. यामध्ये एकूण 450 लोकांनी सहभाग घेतला. नेत्र तपासणी डॉक्टर वानखेडे हॉस्पिटल चे सर्व सहकारी व डॉक्टर उपस्थित होते. दरम्यान नेत्र तपासणी झालेल्या काही नागरिकांचे मोफत मोतीबिंदूचे ही ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सांगवडे चे युवा सरपंच रोहन जगताप यांनी नागरिकांना यापुढेही योग्य त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी उपसरपंच योगेश राक्षे, ग्रामपंचायत सदस्य ललिता लीमन, काजल राक्षे, माया राक्षे, राजश्री राक्षे, अमोल मोकाशी व पोलीस पाटील तुषार मोकाशी, ग्रामसेवक खामकर मॅडम उपस्थित होत्या. यावेळी गावातील सर्वआजी सरपंच व पदाधिकारी तसेच यावेळी गावातील सर्व तरुणांचे विशेष सहकार्य मिळाले व तरुणांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.