23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Vadgaon Maval : पोल्ट्री फार्मर्स यांनी स्वतंत्र व्यवसाय करावा – सोनबा गोपाळे गुरुजी

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पोल्ट्री फार्मर्स यांनी (Vadgaon Maval) पोल्ट्री कंपन्या बरोबर करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करण्यापेक्षा स्वत:चा स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करावा, असे आवाहन पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले.

मावळ तालुका पोल्ट्री संघटनेची विशेष सभा वडगाव मावळ येथे अध्यक्ष एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. सभेस कार्याध्यक्ष सुभाष केदारी, संतोष घारे, सोमनाथ राक्षे, संभाजी केदारी, विनायक बंधाले, महेश कुडले, बाबाजी पाठारे, पवन भवार, गणपत पोटफोडे, लहु दळवी, मल्हारी ढोरे आदी फार्मर्स यावेळी उपस्थित होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे हे शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. बॅंक पक्षी व खाद्य तसेच औषधे यासाठी प्राधान्याने कर्ज देणार आहे. याचा लाभ पोल्ट्री फार्मर्सने घ्यावा असे आवाहन गोपाळे गुरूजी यांनी यावेळी केले.
Pune Municipal Election 2022 : पुण्यातील मतदारांमध्ये 2017 च्या तुलनेत 8.5 लाख संख्येने वाढ

या सभेत काही ग्रामपंचायतीने अवास्तव कर (पोल्ट्री कर) आकारणी केली (Vadgaon Maval) आहे. ती रद्द करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले.

spot_img
Latest news
Related news