Vadgaon Maval News : वडगाव शहर भाजपच्या वतीने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली!

एमपीसी न्यूज – वडगाव शहर भाजपाची मंगळवार (दि. 8) रोजी मासिक बैठक संपन्न झाली. वडगाव शहरातील भाजपचे नगरसेवक यांच्या प्रयत्नातून वडगाव शहरात विविध कामाचा  बैठकीत आढावा घेत असताना, प्रामुख्याने बुथ रचना, वडगाव शहर नूतन कार्यकारणी, मार्च 2022 मध्ये होणारी वडगाव सोसायटी निवडणूक, या सर्व विषयावर चर्चा झाली. या बैठकीच्या सुरुवातीला भारतरत्न, गानसम्राज्ञी स्व.लता मंगेशकर, माजी खासदार स्व. गजानन बाबर व पिंपरी चिंचवडजे भाजपचे नेते स्व. गजानन चिंचवडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर, जेष्ठ नेते सोपान ढोरे, माजी विश्वस्त अरविंद पिंगळे,पंढरीनाथ भिलारे,ॲड तुकाराम काटे,नारायण ढोरे,दीपक बवरे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर,शहर अध्यक्ष अनंता कुडे, विरोधीपक्षनेत्या अर्चना म्हाळसकर,गटनेते दिनेश ढोरे नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर,दीपाली मोरे, ॲड विजय जाधव  रविंद्र काकडे, शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे,

किरण भिलारे, सोमनाथ काळे, नंदकुमार दंडेल,गोपाळ भिलारे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे,युवक अध्यक्ष विनायक भेगडे,दीपक भालेराव, भूषण मुथा, कल्पेश भोंडवे,शंकर भोंडवे,दीपक पवार,संतोष म्हाळसकर,श्रीधर चव्हाण, रोहिदास गायकवाड, संतोष पिंपळे, हरीश दानवे,विराज हिंगे,शरद मोरे ,प्रज्योत म्हाळसकर, शेखर वहिले, महेंद्र म्हाळसकर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी श्रद्धांजली समर्पित केली. ते म्हणाले की गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या सुरांमुळे देशातील वातावरण, सभ्य, सुसंस्कृत व कलहविरहीत राहण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी तर आभार महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.