Wakad : शस्त्र बाळगल्या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad) रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास डांगे चौक येथे करण्यात आली.

विशाल उर्फ रावण सिद्धू बनसोडे (वय 25, रा. खडकवासला पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना माहिती मिळाली की, डांगे चौकात एक तरुण पिस्टल घेऊन येणार आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी सापळा लावून विशाल बनसोडे याला ताब्यात घेतले.

Pimpri : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरीत साखळी उपोषणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्वर तसेच दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी शस्त्रे जप्त करत विशाल बनसोडे याला अटक केली.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान तपासात आरोपी विशाल याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात सन 2022 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार संदीप गवारी, वंदु गिरे, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.