Wakad News : महिलेवर बलात्कार करून खून करण्याची धमकी; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – एका महिलेला घरी भांडी घासण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुणाला काही सांगितल्यास खून करण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) दुपारी सव्वादोन वाजता नढेनगर, काळेवाडी येथे घडली.

कैलास पांचाराम जांगीड (वय 44, रा. नढेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तो आजारी असल्याचा बहाणा केला. त्यांनतर पीडित महिलेच्या पतीला विश्वासात घेऊन फिर्यादी महिलेस त्याच्या घरी भांडी घासण्यासाठी बोलावून घेतले. महिला भांडी घासण्यासाठी आली असता आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास मी तुझा खून करेन अशी धमकी आरोपीने फिर्यादी महिलेला दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.