Kothurne Case : कोथुर्णे घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी सर्वस्व पणाला लावू – अजित पवार

एमपीसी न्यूज – कोथुर्णे येथे (Kothurne Case) घडलेल्या अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला शिक्षा देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे आश्वासन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले. कोथुर्णे घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अजित पवार यांनी कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी पवार यांनी सांगितले, की ही घटना अतिशय दुर्दैवी व मनाला सुन्न करणारी आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेत व दबाव होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या केससाठी निष्णात विशेष सरकारी वकील व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
घटनेतील हा आरोपी या गावातील असून, त्याने यापूर्वीदेखील असाच एक प्रकार केला असल्याचे ग्रामस्थांनी अजित पवार यांना सांगितले. तेव्हा पवार म्हणाले, की त्याच वेळी त्याला शिक्षा झाली असती तर आज ही घटना घडली नसती. झालेला प्रकार दुर्दैवी आहे. निष्पाप चिमुरडी आता पुन्हा येणार (Kothurne Case) नसली तरी तिला न्याय मिळवून देणे व असे कृत्य करणाऱ्या आरोपीला मरेपर्यत फाशी देणे गरजेचे आहे.

समाजात यामधून एक मेसेज जाईल व असे कृत्य करायला कोणी धजावणार नाही. राज्यात याबाबत कायदा कठोर
करण्यासाठी विधिज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे काम सुरू आहे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.