Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये दडले काय? राष्ट्रवादीची होणार का भांडाफोड?

एमपीसी न्यूज : आज महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. प्रथमच शिंदे गट आणि ठाकरे गट आज समोरासमोर येणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून आपली भूमिका बजावणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे. परंतु, याआधी एक मोठा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीचा एक मोठा नेता भेटणार असे ट्विट केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घोटाळ्या प्रकरणी काहींची चौकशी सुरु आहे तर काही तुरुंगात आहेत. अशातच कंबोज यांनी केलेले ट्विट हे फार महत्त्वाचे ठरत आहे. सिंचन घोटाळ्याची मागणी केली जात असल्याने हा नेता कोण आहे? अशी चर्चा केली जात आहे. या शिवाय हि माहिती भाजप नेत्यांना मिळते (Mohit Kamboj) कुठून अशी देखील चर्चा केली जात आहे.

त्या दरम्यान त्यांनी दुसरे ट्विट करत म्हंटले आहे, कि लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार आहे. त्यामध्ये संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि संपत्तीची यादी पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे.

Maharashtra Monsoon Assembly : ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; आज होणार खडाजंगी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.