Pune News : जगू द्याल की नाही…!, राज ठाकरे आता कोणावर भडकले? 

एमपीसी न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आक्रमक आणि स्पष्टवक्ती स्वभावामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण तापलं. मशिदीवरील भोंग्यांचा विषय असो किंवा त्यांचा अयोध्या दौरा असो. या कारणामुळे आता राज ठाकरे सतत चर्चेत आहे. त्यामुळे जिथे जिथे कुठे जातील तिथे माध्यमांचे कॅमेरे त्यांच्या मागावर असतात. काल मात्र ते चक्क  माध्यमांवर संतापलेले पाहायला मिळालं. पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला त्यांनी मंगळवारी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी हा प्रकार घडला. 

पुणे शहराच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी पुस्तक खरेदी करण्यासाठी अभिनव चौकातील अक्षरधारा बुक गॅलरी या दुकानाला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी अनेक पुस्तके चाळली आणि अनेक पुस्तके विकत घेतली. मात्र दुकानात जाण्याच्या आधी माध्यमांच्या प्रतिनिधींवर ते चांगलेच भडकले.

अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी राज ठाकरे आले असताना माध्यमांचे अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. कॅमेराचा लाईट लागलेला असल्यामुळे त्याचा त्रास राज ठाकरेंना जाणवला. हायलाइट्स ऑफ फोकस त्यांनी बंद करायला लावला आणि थोडसं पुढे येत जगु द्याल की नाही, बंद कर ते, वेगळं सांगू का सगळ्यांना… अस म्हणत माध्यमांच्या प्रतिनिधींना सुनावलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.