Chikhali Crime News : मुली झाल्या म्हणून विवाहितेचा छळ; जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – दोन्ही मुलीच झाल्या म्हणून साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेवून विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जून 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तळवडे तसेच हुनसनाळ, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक येथे घडली.

संजय शंकर भाईकट्टे (रा. रुपीनगर, तळवडे), सासू पुतळाबाई शंकर भाईकट्टे, सविता महादेव मोरे, हारुबाई तानाजी बोडके, पारुबाई सचिन सुरवसे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील संजय भाईकट्टे याला पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण देवाप्पा कांबळे (वय 50, रा. बिदर, कर्नाटक) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 12) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 22 वर्षीय मयत मुलगी तिच्या सासरी नांदत असताना तिच्या सासरच्यांनी तिचा छळ केला. फ्लॅट खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पती सहवासापासून सुमारे साडेतीन वर्षे वंचित ठेवून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचे जिवन जगण्यास असहय्य करून आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.