India Corona Update: देशात 1.21 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 1.01 टक्के 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 499 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 23 हजार 598 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या 1.21 लाख ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्हीटी रेट 1.01 टक्के एवढा खाली आलाय. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 05 हजार 844 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 22 लाख 70 हजार 482 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.52 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 13 हजार 481 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.57 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 11.36 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 177 कोटी 17 लाख 68 हजार 379 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.