Rahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब यांच्या 100 किलो रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चरची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल

एमपीसी न्यूज : आर्टिसनल केक, कपकेक, कुकीज किंवा कस्टमाइझ्ड थीम केक बेकिंग असो, पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब यांची कलाकृती नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. नुकतेच त्यांच्या या कलेची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. प्राची यांनी साकारलेल्या 100 किलो शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर हा रेकॉर्ड नोंदविला आहे.

प्राची यांनी या खाद्य संरचनेतून मिलन कॅथेड्रेल स्मारक साकारले. या स्मारकाच्या वास्तूची लांबी 6 फूट 4 इंच, उंची 4 फूट 6 इंच आणि रुंदी 3 फूट 10 इंच आहे. कॅथेड्रलचे स्मारक करण्यासाठी सुमारे 1,500 तुकड्यांची आवश्‍यकता असल्याने नियोजन आणि तयारीला बराच वेळ लागला. प्राची यांनी एकट्याने प्रत्येक तुकडा तयार केला आणि नंतर ते तुकडे एकत्र करण्यास त्यांना सुमारे एक महिना लागला. या कॅथेड्रल संरचनेचे प्रत्येक पैलू योग्यरित्या मिळवणे हे निश्‍चितच एक आव्हान होते, परंतु मला ते तयार करण्यात खूप आनंद झाला असल्याचे प्राची यांनी सांगितले.

सामान्यतः, रॉयल आयसिंगच्या पारंपारिक रेसिपीमध्ये अंडी असतात; परंतु भारतीय बाजारपेठ लक्षात घेत, प्राचीने अंड्याचा वापर न करता, पूर्णत: शाकाहारी उत्पादन “व्हेगन रॉयल आयसिंग’ विकसित केले. भारतीय कंपनी-सुगारिनच्या सहकार्याने हे स्मारक साकारण्यात आले असोन, प्राची यांचे हे उत्पादन भारतात, तसेच जगभरात उपलब्ध आहे.

आपल्या या कलेच्या आणि आतापर्यंतच्या प्रवासाबाबत बोलताना प्राची म्हणाल्या,”” रॉयल आयसिंग या किचकट कलेबाबतचे शिक्षण मी युनायटेड किंगडममध्ये जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. 2014 मध्ये, मी माझा पहिला 3-4 इंच उंच खाण्यायोग्य रॉयल आयसिंग गॅझेबो वापरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातत्याने याबाबत नवनवीन प्रयोग करत, विविध वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य संरचना तयार केल्या. 2020 मध्ये मी तयार केलेली 3.9 फूट रॉयल आयसिंग रचना ही त्यापैकीच एक होती.

मात्र नुकत्याच तयार केलेल्या मिलान कॅथेड्रल या संरचनेची जगभरातून दखल घेतली गेली, त्याबद्दल मला ओळखले गेले आणि बरीच प्रशंसा झाली. भारतातील प्रमुख रॉयल आयसिंग कलाकारांपैकी एक म्हणून ओळख मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही, कारण हे माध्यम काम करण्यासाठी अवघड आहे आणि ते नाजूक मानले जाते. रॉयल आयसिंग हे अत्यंत प्रतिष्ठित आहे आणि ब्रिटिश राजघराण्यातील केक सजवण्यासाठी वापरला जातो. तथापि, या नाजूक कलेसाठी मोठ्या प्रमाणात संयम आणि कौशल्ये आवश्‍यक आहेत आणि तिला जगभरात अतिशय मर्यादित व्यावसायिक यश मिळते आणि या कलेचा प्रचार करणे आणि हे माध्यम तिच्या कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी जिवंत ठेवणे ही माझी महत्त्वाकांक्षा आहे.”

वयाच्या तिशीत प्रचंड यश मिळविलेल्या प्राची यांचे आई-वडील डेहराडूनचे आहेत आणि त्यांचे लग्न पुण्यात काम करणाऱ्या आयटी व्यावसायिकाशी झाले आहे. परंतु पश्‍चिम बंगालमधील पूर्वीच्या धालभूम राजघराण्याशीदेखील त्यांची मुळे जोडली आहेत. त्यांचे काम अतिशय तंतोतंत आहे, प्रत्येक तपशिलावर त्यांची बारीक नजर असते. राजेशाहीचे प्रतीक असलेले आलिशान बेक बनवण्याच्या कलेमध्ये प्राचीने प्रभुत्व मिळवले आहे, जे त्यांच्या आकर्षक रचनेबरोबरच आणि चवीला स्वादिष्ट असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी बऱ्याचदा त्यांना “रॉयल आयसिंगची राणी” असे संबोधले जाते.

जगभरातील कलात्मक घटकांपासून प्रेरणा घेऊन, प्राचीने तिच्या केक डिझाइनमध्ये या गोष्टींचा समावेश केला आहे. त्यांना व्हिक्‍टोरियन आणि युरोपियन वास्तुकलेचे सौंदर्य आणि अभिजातता नेहमीच मोहित करते. त्यांना केकच्या माध्यमातून या स्मारकांना पुन्हा साकारायला आवडते.

आपल्या पुढील प्रवासाबाबत प्राची म्हणाली, “” माझ्या कौशल्यांचा आणि कलात्मकतेचा अधिक विस्तार करण्यासाठी मला नवीन तंत्रे शिकायची आहे तसेच नवीन घटकांचा शोध सुरू ठेवायचा आहे. रॉयल आइसिंग कलेचा प्रचार करणे आणि केक आणि बेकिंग उद्योगात या कलेला अधिक स्थान निर्माण करण्यात मदत करणे ही माझी मुख्य महत्त्वाकांक्षा आहे.”

पुरस्कार आणि मान्यता-

– मार्च 2020मधील फोर्ब्समध्ये आधुनिक भारताच्या गेम चेंजर्सपैकी एक,

– इकॉनॉमिक टाइममध्ये भारतातील ईटी नवीन निर्मात्यांपैकी एक म्हणून सन्मानित, नोव्हेंबर 2020

– मार्च 2021मधील टाइम्स वुमन ऑफ सबस्टन्सपैकी एक

– फोर्ब्स इंडिया मध्ये डब्ल्यु बी आर कॉर्प यूके लिमिटेड 45 अंडर 45 – इंडिया एडिशन लिस्टमध्ये

– फेमिना’च्या सर्वात शक्तिशाली 2021 पैकी एक म्हणून वैशिष्ट्यीकृत

– केक मास्टर्स मॅगझिन इंडिया द्वारे 2017 साली टॉप 10 केक आर्टिस्ट ऑफ इंडिया’ने सन्मानित

– केक मास्टर्स मॅगझिन भारत 2018 मध्ये टॉप 10 केक आर्टिस्ट

– भारतीय केक उद्योगासाठी मुंबईतील राष्ट्रीय स्तरावरील केक पुरस्कार शोसाठी इंडियन केक अवॉर्डसाठी परीक्षक 2019

– बर्मिंगहॅममध्ये 2019 साठी केक मास्टर्स रॉयल आयसिंग पुरस्कार.

– बृजभूमी फाऊंडेशनतर्फे 2019 साली महाराष्ट्रातील टॉप 50 सर्वात प्रभावशाली महिला म्हणून सन्मानित

– झी इंडिया एक्‍सलन्स अवॉर्डसद्वारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा केक आर्टिस्ट पुरस्कार

– लोकमत समूहातर्फे 2020 आणि 2021 साठी पुण्यातील यशवंत महिला म्हणून सन्मानित

– महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते जुलै 2021 मध्ये भारत लीडरशिप पुरस्काराने’ने सन्मानित

– टॉप 4 रॉयल आयसिंग आर्टिस्ट केक मास्टर्स अवॉर्डस बर्मिंगहॅम, 2017

– टॉप 4 सर्वोत्कृष्ट मासिक कव्हर केक मास्टर्स पुरस्कार बर्मिंगहॅम, 2017

– रॉयल आइसिंग आर्टिस्ट, केक मास्टर्स अवॉर्डस विजेता, बर्मिंगहॅम, 2019

– जानेवारी 2022 मध्ये सर्वाधिक अंडी-मुक्त, शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर्ससाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनद्वारे सन्मानित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.