रविवार, जानेवारी 29, 2023

Moshi : मोशी येथून गोमांस सदृश्य 127 किलो मांस जप्त

एमपीसी न्यूज – मोशी येथून (Moshi) एमआयीडीसी भोसरी पोलिसांनी गोमांस सदृश् 127 किलो मांस जप्त केले आहे. हि कारवाई पोलिसांनी रविवारी (दि.14) दुपारी पावणे चारच्या सुमारास मोशीतील आदर्शनगर परिसरात केली. या प्रकरणी पोलिसांनी कादिर नजीर कुरेशी (वय 33, रा. खराळवाडी) यांना समजपत्र बजावले आहे.

कुरेशी याचे मोशी आदर्शनगर येथे मांस विक्रीचे दुकान आहे. पोलिसांनी तेथे तपासणी केली असता त्यांना 12 हजार रुपये किंमतीचे 127 किलो गोवंश सदृश्य मासांचे तुकडे मिळाले. कायद्यानुसार गोमांस विक्रीवर बंदी असल्याने पोलिसांनी हे मांस जप्त करत कुरेशी याला समजपत्र (Moshi) बजावले आहे.

Rajesh Patil Transferred : सरकार बदलताच आयुक्त बदलले; बरेच दिवस ‘या’ कारणांनी वादात सापडले होते आयुक्त

Latest news
Related news