India Corona Update : चोवीस तासांत 2.38 लाख नवे रुग्ण, 1.57 लाख जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 38 हजार 018 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1 लाख 57 हजार 421 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 14.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 76 लाख 18 हजार 271 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 53 लाख 94 हजार 882 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 94.08 टक्के एवढा झाला आहे.

सध्याच्या घडीला देशात 17 लाख 36 हजार 628 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 310 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 86 हजार 761 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.29 टक्के एवढा झाला आहे.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 70.54 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 158.05 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.