Corona Update : महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट 92.04 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 55 लाख 53 हजार 225 कोरोनाबाधीत आढळले. यापैकी 51 लाख 11 हजार 95 जण बरे झाले. यामुळे रिकव्हरी रेट शुक्रवारच्या 91.74 टक्क्यांवरुन शनिवारी 92.04 टक्क्यांवर पोहोचला. डेथ रेट जैसे थे तर पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 87 हजार 300जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधितांपैकी 2 हजार 583 जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. यामुळे डेथ रेट 1.57 टक्के आहे. शुक्रवारीही राज्याचा डेथ रेट अर्थात मृत्यू दर एवढाच होता.

महाराष्ट्रात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 23 हजार 361 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 55 लाख 53 हजार 225 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 16.97 टक्क्यांवर आला. याआधी शुक्रवारी राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 17.04 टक्के होता.

मागील 24 तासांत राज्यात 26 हजार 133 नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 40 हजार 294 जण मागील 24 तासांमध्ये बरे झाले. तसेच राज्यात कोरोनामुळे 24 तासांमध्ये 682 मृत्यू झाले. याआधी शुक्रवारी राज्यात 29 हजार 644 नवे कोरोना रुग्ण आढळले आणि 44 हजार 493 बरे झाले होते. तसेच शुक्रवारी राज्यात 555 मृत्यू झाले होते.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 52 हजार 247 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 27 लाख 55 हजार 729 जण होम क्वारंटाइन आहेत तर 22 हजार 103 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

मुंबई ६,९५,४८३ ६,५०,६९१ १४,५१६ २,०४४ २८,२३२
ठाणे ५,५५,७६९ ५,२२,५०९ ७,८९२ ३१ २५,३३७
पालघर १,१०,६९८ १,००,१५० १,६७१ १२ ८,८६५
रायगड १,४३,०३५ १,३४,३१४ २,६४१ ६,०७८
रत्नागिरी ३८,६८७ ३१,१४४ ८०४ ६,७३७
सिंधुदुर्ग २१,७६० १७,२८० ५५९ ३,९१३
पुणे ९,९६,१११ ९,३०,७८७ ११,०६८ ५८ ५४,१९८
सातारा १,४५,९४३ १,२५,५२३ २,७०९ १५ १७,६९६
सांगली १,१४,९८६ ९४,४६० २,६०५ १७,९१८
१० कोल्हापूर ९७,९६८ ८१,१६६ ३,०९८ १३,७०१
११ सोलापूर १,५२,९५४ १,३१,०७४ ३,७२० ६५ १८,०९५
१२ नाशिक ३,७७,७०० ३,५७,२०६ ४,२५३ १६,२४०
१३ अहमदनगर २,३७,६८५ २,१७,३०० २,६२९ १७,७५५
१४ जळगाव १,३५,००९ १,२४,८१३ २,२९८ ३२ ७,८६६
१५ नंदूरबार ३८,४४० ३६,३०८ ७७९ १,३५०
१६ धुळे ४३,९६४ ४०,३८४ ५०७ १२ ३,०६१
१७ औरंगाबाद १,४३,५९२ १,३४,३६९ २,५१२ १४ ६,६९७
१८ जालना ५६,३०८ ५०,२५४ ८७७ ५,१७६
१९ बीड ८१,३५५ ७०,११२ १,७०५ ९,५३०
२० लातूर ८७,५३४ ८१,१६४ १,५५४ ४,८१२
२१ परभणी ४८,६६४ ४३,१६४ ८६४ ११ ४,६२५
२२ हिंगोली १७,२६५ १४,८९५ ३०७ २,०६३
२३ नांदेड ८८,८२१ ८३,२६६ २,०८८ ३,४६०
२४ उस्मानाबाद ५४,५३६ ४७,६५५ १,२३७ ५५ ५,५८९
२५ अमरावती ८४,९७५ ७४,३८४ १,२९३ ९,२९६
२६ अकोला ५३,३३९ ४६,२४१ ८२३ ६,२७१
२७ वाशिम ३७,६१६ ३३,३८५ ४९१ ३,७३७
२८ बुलढाणा ७३,४६८ ६८,४०२ ४५० ४,६११
२९ यवतमाळ ६८,९०० ६३,७११ १,२६८ ३,९१७
३० नागपूर ४,८५,३८७ ४,६०,४७९ ६,३७७ ४९ १८,४८२
३१ वर्धा ५६,००५ ५०,८२८ ७८५ ८६ ४,३०६
३२ भंडारा ५८,२४९ ५५,६९५ ७२७ १,८१८
३३ गोंदिया ३९,४५८ ३७,२६७ ४२२ १,७६२
३४ चंद्रपूर ८३,९६९ ७५,५३० १,३०४ ७,१३३
३५ गडचिरोली २७,४४६ २५,१८५ ३४९ १८ १,८९४
इतरराज्ये/ देश १४६ ११८ २६
एकूण ५५,५३,२२५ ५१,११,०९५ ८७,३०० ,५८३ ,५२,२४७

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.