Dighi News : प्रांत अधिकारी असल्याचे सांगून दोन लाख 13 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्रांत अधिकारी असल्याचे सांगून जुन्या गाड्यांचे लिलाव करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे असे सांगत जुन्या गाड्या घेऊन देण्यासाठी तीन जणांकडून दोन लाख 13 हजार रुपये घेतले. या बदल्यात कोणतीही गाडी खरेदी करून न देता फसवणूक केली. ही घटना 25 मार्च 2020 ते तीन जानेवारी 2021 या कालावधीत दिघी आळंदी रोडवरील माऊली मल्टी कार केअर सेंटर मध्ये घडली.

तुषार मारुती ठिगळे (पूर्ण पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अवदेशकुमार रमाकांत मिश्रा (वय 56, रा. गणेशनगर, दापोडी) यांनी रविवारी (दि. 1) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार याने तो प्रांत अधिकारी आहे. बँकेकडून जुन्या गाड्यांचे लिलाव करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. तसेच चारचाकी गाडी घेऊन देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी तुषार याने फिर्यादी यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये, अक्षय पाटील यांच्या आई कडून 41 हजार रुपये, संजय शेटे यांच्याकडून 42 हजार रुपये असे एकूण दोन लाख 13 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तुषार याने गाडी न देता फिर्यादी यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.