Talegaon Dabhade News : तळेगाव खिंडीत ब्रिटिशांवर मराठ्यांनी मिळवलेल्या विजयाचा सोहळा

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य पूर्व काळात सातत्याने विजय प्राप्त करणारे ब्रिटिश 9 जानेवारी 1779  रोजी पुणे ताब्यात घेण्यास निघाले. मात्र मराठी फौजांनी ब्रिटिशांना तळेगाव दाभाडे खिंडीत घेरले. त्यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि मराठी फौजांपुढे ब्रिटिशांनी घुडघे टेकले. या विजयाचा सोहळा आजही तळेगाव दाभाडे खिंडीत स्थापन केलेल्या विजय मारुती मंदिरात साजरा केला जातो. यावर्षी हा विजय सोहळा चौराई देवीच्या मंदिरात साजरा करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळात सातत्याने विजय प्राप्त करणारी ब्रिटिश राजवट त्यावेळी पुणे ताब्यात घ्यायला निघाली. मात्र 9 जानेवारी 1779 साली तळेगाव दाभाडे मधील खिंडीत मराठे व ब्रिटिशांचे घनघोर युद्ध झाले. यात मराठ्यांचा मोठा विजय झाला. याचे प्रतीक म्हणून तळेगावच्या खिंडीत विजय मारुतीची स्थापना केली गेली.तो विजय दिवस येथे उत्साहात साजरा केला जातो.

बजरंगदल – विश्वहिंदू परिषदेकडून हा विजय दिवस  प्रतीवर्षी साजरा केला जातो. यावर्षी चौराई देवीच्या मंदिरामध्ये विजय दिवसाचा समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांचे ब्रिटिश मराठा युद्धावर व्याख्यान झाले. ते म्हणाले,प्लासी (1757), पानिपत(1761),बलसाड (1764)या युद्धांमध्ये ब्रिटिशांचा विजय झाला.

मराठे सोडता या काळामध्ये ब्रिटिशांना थोपवणारी एकही राजसत्ता भारतामध्ये नव्हती. सातत्याने विजय प्राप्त करणारी ब्रिटिश राजवट या वेळी पुणे ताब्यात घ्यायला निघाली मात्र, महादजी शिंदे, नाना फडणवीस, सरदार रास्ते, तुकोजी होळकर, भिवराव पानसे यांच्या समोर ब्रिटिशांनी गुडघे टेकले मराठी सत्तेचा मोठा विजय यावेळी झाला. तो या तळेगावच्या विजय खिंडीमध्येच असे बो-हाडे म्हणाले.

या वेळी चौराई मातेला अभिषेक घालण्यात आला. संदेश भेगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महेन्द्र असवले, सचीन शेलार, ब्रिजेश चौहान, निखिल भांगरे, भास्कर गोलिया, पुरुषोत्तम राऊत, विश्वनाथ जावलीकर, निलेश गराडे यांनी नियोजन केले.तर आभार ॲड गणेश जगताप यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.