-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali News : चिखली प्राधिकरणात रत्नाकर बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – चिखली प्राधिकरण येथे असलेल्या रत्नाकर बँक लिमिटेडचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली. याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय लक्ष्मण कुरणे (वय 39, रा. कळस माळवाडी आळंदी रोड, पुणे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली प्राधिकरण येथे सेक्टर क्रमांक 11 मध्ये रत्नाकर बँकेचे एटीएम आहे. सोमवारी रात्री पावणे अकरा ते मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने एटीएमच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. एटीएम तोडून त्याचे नुकसान केले. तसेच मशीन मधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn