Moshi News : शाब्दिक वादावरून मोशीत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – शाब्दिक वादावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि खुर्च्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री पावणे बारा वाजता देहू-आळंदी रोड मोशी येथील चौधरी ढाब्यात घडली.

ऋषिकेश काशिनाथ तांबे (वय 23, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश यांचा मित्र अजय युवराज बोत्रे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

शुभम सस्ते, त्याच्या सोबतचा अनोळखी इसम, किशोर पवार आणि त्याच्या सोबतचे तीनजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू-आळंदी रोडवर असलेल्या चौधरी ढाब्यात फिर्यादी यांचा मित्र अजय आणि आरोपी शुभम यांचा किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यातून आरोपींनी ‘तुला जास्त मस्ती आली आहे. थांब तुला खलास करून टाकतो’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी आणि खुर्च्यांनी, लाकडी बांबूने अजय यांच्या छातीवर, पोटावर, हातावर, डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. अजय यांना ठार मारण्याचा आरोपींनी प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.