Bhosari News : भोसरीतील बैलगाडा शर्यत रद्द; मंगळवारी कुस्तीच्या स्पर्धा होणार

एमपीसी न्यूज – भोसरी गावात सालाबादप्रमाणे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव सोमवारी आणि मंगळवारी (दि. 18 आणि 19 एप्रिल) होणार आहे. सोमवारी होणाऱ्या बैलगाडा शर्यत काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

सोमवारी सकाळी सहा वाजता श्रीं ची पूजा, सायंकाळी साडेसात वाजता लोकनाट्य तमाशा, सायंकाळी साडेसात ते रात्री दहा पर्यंत श्रीं च्या पालखीची मिरवणूक आणि ढोल ताशांचे खेळ होणार आहेत.

मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी 12 लोकनाट्य तमाशाची हजेरी, सकाळी नऊ ते दुपारी 12 पर्यंत श्री भैरवनाथ मंदिर मध्ये चक्री भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा हे नियोजित कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती भोसरीतील श्री भैरवनाथ मंदिर उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.