22.8 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

Bhosri Crime : अधिकचा नफा देतो सांगून महिलेची 65 लाखांची फसवणूक

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : भोसरी पोलिसांनी 65.71 लाख रुपयांची (Bhosri Crime) फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात श्रीकांत होलेहुन्नूर (रा. बंगलोर, राज्य कर्नाटक), अशोक जाधव (मोशी), तसेच इतर आरोपींचाही समावेश आहे. पोलिसांनी श्रीकांत होलेहुन्नूर या आरोपीस अटक केली आहे.

27 डिसेंबर 2021 ते 8 मार्च 2022 दरम्यान राजदिप एनवॉयरॉकॉन कंपनी समोर भोसरी येथे आरोपी यांनी संगनमताने मिळून त्यांची कंपनी फोरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करत असल्याचे भासवून फिर्यादीस 75 दिवसांमध्ये 60 टक्के अधिकचा नफा मिळवून देण्याची स्कीम सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

Chikhali Crime : बस प्रवासात महिलेच्या पर्समधून सव्वा दोन लाखांची चोरी; दोन सोन्याच्या पोत आणि पैसे चोरीला

आणि फिर्यादी यांच्याकडून 1,12,51,840 रुपये ठेव स्वीकारली व त्या बदल्यात आजपर्यंत फक्त 46,79,880 रुपये रक्कम परतावा देऊन उर्वरित 65,71,960 रुपयांची फसवणूक (Bhosri Crime) केली आहे. आरोपिंच्या विरोधात भा. द. वि कलम 406, 409, 420, एम पी आयटी ऍक्ट कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img
Latest news
Related news