Talegaon News : आयसीयू वॉर्डमध्ये कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू वाॅर्डात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केली. हा प्रकार आज रविवार (दि. 9) सकाळी उघडकीस आला आहे. आत्महत्या केलेल्या रुग्णाबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी तळेगाव पोलिसांना फोनवरून माहिती मिळाली की तळेगाव येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू वाॅर्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने आत्महत्या केली आहे.

त्यानुसार तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व खबरदारी घेऊन पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.