Pune News : उसन्या पैशासाठी तरुणीच्या किडन्या काढून विकण्याची धमकी, पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज : एका 24 वर्षीय तरुणीच्या मित्राने उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने पाच जणांनी या तरुणीचे अपहरण करून तिला डांबून ठेवले आणि उसने पैसे परत मिळाले नाही तर या तरुणीच्या किडन्या काढून विकण्याची आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याची धमकी देण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारी नंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी निकिता पवन गवळी, शेरवानी सॅमवेल बोरडे, सोनू सौदागर गुड्डूगडे, सौरभ हिरामन गायकवाड आणि हर्षदा सुरेश बोरकर या पाच जणांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणीच्या मित्राने आरोपी निकिता गवळी हिच्याकडून पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत न दिल्याने फिर्यादी तरुणीचे आरोपींनी अपहरण केले आणि तिला बिबवेवाडी येथील एका घरामध्ये कोंडून ठेवले. फिर्यादी ची मैत्रीण, तिची आई, बहीण आणि तिची मुलगी या सर्वांना आरोपींनी बिबेवाडी येथील एका घरात कोंडून ठेवले. आणि फिर्यादीच्या मित्राने घेतलेले पैसे परत नाही दिले तर घरातील पाळीव कुत्रा अंगावर सोडण्याची भीती दाखवली.

तसेच पैसे नाही दिले तर तुझ्या किडन्या काढून विकील नाहीतर तुला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडेल अशी धमकी दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.