Vehicle Theft : चाकण, निगडी, चिखलीमधून पाच स्प्लेंडर दुचाकी चोरीला

0

एमपीसी न्यूज – निगडी परिसरातून दोन, चिखली आणि चाकण मधून प्रत्येकी एक स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली. याबाबत गुरुवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुलेमान वजीर मलिक (वय 38, रा. नॅशनल बेकरीसमोर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मलिक यांनी 25 हजारांची स्प्लेंडर (एम एच 14 / एच ए 8832) दुचाकी चोरट्यांनी लॉक खोलून चोरून नेली. ही घटना 18 एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजताच्या कालावधीत मलिक यांच्या घरासमोर घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

प्रमिल सदाशिव गायकवाड (वय 27, रा. यमुनानगर, निगडी), प्रशांत भेरू कुंभार (वय 26, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची 20 हजारांची स्प्लेंडर (एम एच 10 / बी के 8989) दुचाकी 19 एप्रिल रोजी दुपारी दोन ते रात्री बारा वाजताच्या कालावधीत त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. तर कुंभार यांची 20 हजारांची स्प्लेंडर (एम एच 09 / बी व्ही 2683) दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली. ही घटना 19 एप्रिल रोजी रात्री दहा ते 20 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

अमोल आबासाहेब तरंगे (वय 23, रा. टॉवरलाईन, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची स्प्लेंडर (एम एच 14 / एफ एच 6184) दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. ही घटना 21 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment