Hinjawadi Crime News : वडिलोपार्जित घरातील हिस्सा मिळविण्यासाठी भावाकडे तगादा लावावा, अशी मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जित घरातील हिस्सा मिळविण्यासाठी भावाकडे तगादा लावावा, या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 एप्रिल 2018 ते दोन एप्रिल 2021 या कालावधीत कोल्हापूर, परळी, लातूर, दयाणे ता. सटाणा जि. नाशिक येथे घडली.

पती गणेश भिकाजी महाडिक (वय 40), दोन महिला आणि नणंदेचे पती दादासाहेब शेळके (रा. आंबेवाडी कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला तसेच फिर्यादी यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर वडिलोपार्जित घरातील हिस्सा मिळविण्यासाठी भावाकडे तगादा लावावा, अशी मागणी केली. दरम्यान, घरातील इतर किरकोळ कौटुंबिक वादातून सतत मारहाण शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.