Sangvi Crime News : तरुण गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी गेला आणि…

एमपीसी न्यूज – गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी गेलेल्या ग्राहक तरुणाला गॅरेज मालक आणि गॅरेजमधील कामगारांनी मारहाण केली. याप्रकरणी गॅरेज मालकासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहा वाजता निलख बाईक सर्व्हिस पॉईंट, पिंपळे निलख येथे घडली.

शफी अन्सारी, बशीर अहमद, शत्रू लहानतरे, सहीउल्ला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम वेदप्रकाश गौड (वय 24, रा. थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौड हे त्यांची गाडी दुरुस्त करण्यासाठी सोमवारी सायंकाळी आरोपीच्या गॅरेजमध्ये गेले होते. तिथे कामाचे पैसे देण्याच्या कारणावरून गौड आणि आरोपी गॅरेज मालकाचे भांडण झाले. गॅरेज मालकाने स्क्रूड्रायव्हरने पायावर मारून दुखापत केली. कामगार बशीर अहमद याने हातोडीने गौड यांच्या डोक्यात मारले. तर शत्रू लहानतरे, सहीउल्ला यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून जखमी केले. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.